Wednesday 24 August, 2011

शक्तीरहस्य: मन जड की अजड (matter or non-matter)

स्वामी विज्ञानानंद यांचे पुस्तक शक्तीरहस्य:


हे पुस्तक म्हणजे "अंनिस" च्या शाम मानव आणि नरेंद्र दाभोळकर यांनी स्वामी विज्ञानानंदांना विचारलेल्या प्रश्नांतून झालेली चर्चा आहे. पहिला भाग हे स्वामीजींनी केलेली प्रस्तावना असून दुसरा भाग शक्ती चर्चा असा आहे. तो संपूर्ण पणे स्वामीजी व अनिस चे वरील दोन कार्यकर्ते यांच्या तील चर्चात्मक संवाद आहे.


स्वामी विज्ञानानंद यांनी,

१. "जड" हे प्रकाशवेगाहून अधिक वेगाने जात नाही जाऊ शकत नाही (आईनस्टाईन) व

२. "मन" म्हणजे subject आणि object यांच्यातील पूल ( ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यातला पूल) या पॉवलॉव्ह या शास्त्रज्ञाची व्याख्या, अधिक

३.Quantum Mechanics मधली हायजेनबर्ग ने मांडलेल्या, निरीक्षकामुळे इलेक्ट्रॉन मधील अनिश्चिततेचा सिद्धांत, अशा तीन वैज्ञानिक व्याख्यांचे एकत्रीकरण करुन मनाचे अजडत्वाची मांडणी केली आहे.

मनाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असल्याने मन हे अजड आहे असे सिद्ध करण्याचा विज्ञानानंदाचा प्रयत्न होता. मी पहात असलेल्या सूर्याचा किरण माझ्यापर्यंत पोचायला ८ मि. लागली हा विचार काही क्षणार्धात मन करु शकते.पहाणारा व सूर्य यांच्यातील या पुलाचा वेग अर्थात मनाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त आहे म्हणून मन हे अजड आहे. या मनाच्या व्याख्येवर स्वामीजींनी काही रशियन शास्त्रज्ञांशी पत्रव्यवहार केला पण स्वामीजींच्या मनाच्या या व्याख्येत ते कोणतीही चूक शोधून काढू शकले नाहित असे विज्ञानानंद यांचे मत होते.

स्वामी तथा मनशक्ती ने मांडलेले काही मुद्दे साधारणपणे असेही होते,

१.मन हे जडबाह्य (Independent of Matter) असून ते जागा व्यापत नाही. ते जड शरीरातही राहू शकते व बाहेर ही जाऊ शकते.

२.ते अजड (non-matter) असल्याने सूर्यावर "पोचले" तरी सूर्यामुळे जळणार नाही किंवा ते शरिरातून किंवा डोक्यातून वाहूनही जाणार नाही. Pavlov च्या एका चर्चेत त्याने मनाविषयी a very delicate co-relation between organism and surrounding world असे वर्णन केले आहे.

३.पॉवलॉव ची व्याख्या स्वामी विज्ञानानंद यांनी निवडली कारण ती त्यांना सर्वात जास्त तर्कशुद्ध वाटली हे एक कारण व पॉवलॉव नास्तिक आहे हे कारणही त्यांना महत्वाचे वाटले. मनाची एक विषिष्ट अनुभूती म्हणजे "आत्मा" जो वैज्ञानिक व्याख्येत (सध्यातरी) आणता येत नाही कारण तो अनुभूतीचा विषय आहे. "मन" मात्र जड किंवा अजड या वैज्ञानिक व्याख्येत आणता येईल अशी त्यांची भूमिका होती.

आधारासाठी घेतलेल्या व्याख्या-

अ. मन म्हणजे delicate bridge between surrounding and organism, by Pavlov.

म्हणजे मन बाहेर गेले.

ब. Electron changes by observation - Copenhagen Interpretation.

म्हणजे मन बाहेरही गेले व मनाने बाह्य जगतावर परिणामही केला.

क. या पुलाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे. - म्हणून मन हे अजड आहे.

या सर्व संवादाच्या ध्वनिफीतीवरुन हे संभाषण लिखित स्वरुपात करण्यात आले. "Dancing Wu Li Masters" व "Tao of Physics" या पुस्तकांच्या संदर्भ विज्ञानानंद यांनी आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ दिले आहेत.

अन्निस च्या या दोन कार्यकर्त्यांनी "मन" हे जडाचाच भाग आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मेंदुतील "इलेक्ट्रॊ बायो केमिकल इंपल्सेस" अशी मनाची मांडणी केली.मन हि वस्तु नाही matter नही याचा अर्थ ती non-matter किंवा अजड आहे असा त्याचा अर्थ होत नसून ती एक concept आहे, रासायनिक प्रक्रियांना दिलेले नाव आहे अशा स्वरुपाचे मुद्दे त्यांनी मांडले. मात्र त्यांनी चर्चेत काही तांत्रिक चुका केल्या व अडचणीत आले. काही अवैज्ञानिक विधानेही त्यांनी केली. उदा. शास्त्रज्ञ वॉल्टर हेस याने औषधे वापरुन "मनात" कायमस्वरुपी बदल घडवून आणता येतो असे इंजेक्शन शोधले ,किंवा प्रकाश पाहता येतो व अंधाराची व्याख्या प्रकाशाच्या उंचवट्यात दिसणारे अस्तित्व इ.इ. त्यावर स्वामीजींनी त्यांना त्यांची विधाने सिद्ध करण्यासाठी एक लक्ष रु. चे प्रतिआवाहन दिले.(आव्हानापेक्षा आवाहन अथवा वादापेक्षा संवाद जास्त बरा असे आपले मत असल्याचे प्रस्तावनेत त्यांनी म्हटले असून अशा "चर्चा" त्यांच्या परंपरेतील नाहीत असेही नमूद करतात)

जड- अजड, चेतन-अचेतन , वैज्ञानिक विधान म्हणजे काय , अंधश्रद्धा म्हणजे काय यावर अतिशय उपयुक्त चर्चा या पुस्तकात वाचायला मिळते.