Skip to main content

भ्रष्टाचारी वृत्तीची कहाणी

भ्रष्टाचारी वृत्तीची कहाणी

श्री. ह.मो.मराठे यांची "मार्केट" ही कादंबरी त्यांनी मालक-कामगार संबंधांवर तसेच औद्योगिक पार्श्वभूमीवर रेखाटली असून त्यातून समाजातील भ्रष्टाचार वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मांडणी
कादंबरीचे कथानक बडया कंपनीमधे मार्केटिंग ऑफीसर असलेल्या सुधाकर केळकर व त्यांच्या कुटुंबियांभोवती फिरत राहते.पैसा हीच निष्ठा असलेल्या केळकरांना अन्य तत्व असे काही नाहीच. उलट आपला कार्यभाग साधण्यासाठी आपल्या सहवासात येणार्या प्रत्येक माणसाला ते पैशाचे तत्वज्ञान सांगून भ्रष्टाचारी व भावनाहीन करुन टाकतात. त्यातून त्यांची पत्नी व मुलगीही सुटत नाही. एकप्रकारे केळकर हे पात्र म्हणजे समाजातील स्वार्थलोलूप भ्रष्टाचारी मंडळींचेच प्रतिक झाले आहे.

कथानक अगदी लहान आहे. कामगारांना बोनस म्हणून अर्धे पैसे रोखीने व उरलेले भेटवस्तूच्या स्वरुपात देण्याची योजना बी.वाय.पी. ही कंपनी आखते. पण भेटवस्तू म्हणून देण्यात आलेल्या सुटकेसेस अतिशय हलक्या दर्जाच्या निघतात. या सुटकेसेस केळकरांच्या कंपनीने तयार केलेल्या असतात. या घटनेचा गवगवा होऊ नये म्हणून केळकर बी.वाय.पी. माणूस विकत घेऊन प्रकरण दाबून टाकतात. यात यश येताच प्रत्येक गोष्टीचे ,अगदी अर्काताच्या नात्यांचेही व्यापारीकरण करुन पैसा मिळवण्याच्या मागे केळकर ही व्यक्ती धावत सुटते.त्यांच्या खेळात त्यांची तरुण मुलगी बळी जाते. पण पैसानिष्ठ केळकर तिच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्यांशीही सौदा करतात.

इंग्रजी शब्दांची बजबजपुरी

कथानकाची मांडणी व सूत्र व्यवस्थित असले तरी कादंबरीची आंग्लाळलेली शाषा अयोग्य वाटते. कादंबरीत वातावरण निर्मितीसाठी व कृत्रिमता येऊ नये म्हणून इंग्रजी शब्द वापरण्याची आता रुढीच होत चालली आहे. पण तरिही कादंबरीत असलेली इंग्रजी शब्द व वाक्यांची बजबजपुरी अजिबात समर्थनीय नाही. कादंबरीच्या कथानकात हा मोठाच अडथळा होऊन बसला आहे.ऑफिसला कार्यालय, फोनला दूरध्वनी अशा प्रतिशब्दांची एकवेळ अपेक्षा नसली तरी- "‘ही टोल्ड की दि होल लॉट इज डिफेक्टिव्ह’- अशा स्वरुपाच्या वाक्यरचना अपेक्षित नव्हत्या. हे वाक्य अपवादात्मक नाही तर सर्व कादंबरीत अशीच भाषा मुक्तहस्ते वापरली गेली आहे. वातावरण निर्मितीसाठी (?) इंग्रजी शब्द वापरणारे लेखक महाशय मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रात मोठमोठया पदांवर काम करणारे साठे ,पेंडसे ,जोग ,पुराणिक इ.नावांची मराठी माणसे दाखवतात. यात;आ बोल्डर ‘तोडकर’ नावाचा आहे. संपूर्ण कादंबरीत केवळ एक ‘आहुजा’ नावाचा असून तो केळकरांचाच बळी ठरलेला दाखवला आहे.आजची वस्तुस्थिती सर्वजण जाणतात. त्यामुळे ही विसंगती वाचकांना बोचल्याविना राहणार नाही.

समाजातून नष्ट होत जाणारी तत्वनिष्ठ माणसे किती दुबळ्या हातांची ठरत आहेत ते केळकरांच्या सासऱ्यांच्या व्यक्तीरेखेतून पुरेसे स्पष्ट केले गेले आहे. सामाजिक नीतीमूल्यांच्या ऱ्हासाबरोबरच ढासळती लग्नसंस्था व कुटुंबव्यवस्था यांचे चित्रणही लेखकाने यशस्वीपणे केले आहे. एकूण भाषाशुद्धता व तपशील यांचे दोष वगळता कादंबरी वाचनीय आहे असे म्हणता येईल.

मार्केट: ह.मो.मराठे
प्र.मॅजेस्टिक प्रकाशन,गिरगाव,मुंबई-४
पृष्ठे २०९

प्रथम प्रकाशन:

दै. तरुण भारत ४ सप्टेंबर १९८८

Comments

suraj mahajan said…
Jwalant-hindutw.blogspot.com/

Popular posts from this blog

वेदोक्त प्रकरण ,लोकमान्य आणि छत्रपति शाहु महाराज

कोल्हापुरचे शाहूमहाराज यांच्या कारकिर्दित सुरुवातीलाच कार्तिकस्नानाचे वेळी राजवाड्यातच एका ब्राह्मणाने (राजोपाध्ये नव्हेत)स्वत: अंघोळ न करताच मंत्र सांगण्याचे ठरवले यावरुन वेदोक्ताचा वाद दिवाळी १९०१ च्या सुमारास निर्माण झाला. राजोपाध्याय स्वत: आजारी असल्याने ते तिथे हजर नव्हते. या ब्राह्मणाने पुराणोक्त मंत्र म्हणावयास सुरुवात केली. जाणकारांनी शाहु महाराजांच्या लक्षात हि गोष्ट आणून देताच त्यांनी जाब विचारला तेव्हा त्या ब्राह्मणाने "छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार नाही, पण पुराणोक्त मंत्रांनी हाच विधी करता येतो!" असे उद्धट उत्तर दिले. पण छत्रपती शाहु महाराज हे वेदांचे प्रचंड अभिमानी होते. त्यांनी वेदोक्त मंत्रोच्चारण करा असे सांगितल्यावरही तो ब्राह्मण ऐकेना, त्यातुन त्याने स्वत: शुचिर्भूत न होता हे मंत्र सांगितले होते. कोल्हापुरच्या ब्राह्मणांनीही या महामूर्ख ब्राह्मणाच्या गाढवपणाचा निषेधच केला. मात्र हा विधी पण संस्थानचे रेव्हेन्यु अधिकारी सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी पुढे हा वाद निर्माण केला व वाढवला, त्याला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच...

शक्तीरहस्य: मन जड की अजड (matter or non-matter)

स्वामी विज्ञानानंद यांचे पुस्तक शक्तीरहस्य: हे पुस्तक म्हणजे "अंनिस" च्या शाम मानव आणि नरेंद्र दाभोळकर यांनी स्वामी विज्ञानानंदांना विचारलेल्या प्रश्नांतून झालेली चर्चा आहे. पहिला भाग हे स्वामीजींनी केलेली प्रस्तावना असून दुसरा भाग शक्ती चर्चा असा आहे. तो संपूर्ण पणे स्वामीजी व अनिस चे वरील दोन कार्यकर्ते यांच्या तील चर्चात्मक संवाद आहे. स्वामी विज्ञानानंद यांनी, १. "जड" हे प्रकाशवेगाहून अधिक वेगाने जात नाही जाऊ शकत नाही (आईनस्टाईन) व २. "मन" म्हणजे subject आणि object यांच्यातील पूल ( ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यातला पूल) या पॉवलॉव्ह या शास्त्रज्ञाची व्याख्या, अधिक ३.Quantum Mechanics मधली हायजेनबर्ग ने मांडलेल्या, निरीक्षकामुळे इलेक्ट्रॉन मधील अनिश्चिततेचा सिद्धांत, अशा तीन वैज्ञानिक व्याख्यांचे एकत्रीकरण करुन मनाचे अजडत्वाची मांडणी केली आहे. मनाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असल्याने मन हे अजड आहे असे सिद्ध करण्याचा विज्ञानानंदाचा प्रयत्न होता. मी पहात असलेल्या सूर्याचा किरण माझ्यापर्यंत पोचायला ८ मि. लागली हा विचार काही क्षणार...

सावरकरांचा बुद्धीवाद

सर्व प्रकारची कर्मकांडे नाकारणाऱ्या, हिंदुत्वाशी नाते जोडणाऱ्या, हिंदुंपासून थेट मुसलमानांच्या अंधश्रद्धांवर कोणत्याही राजकीय भवितव्याची तमा न बाळगता, कठोर बुद्धीवादाच्या कसोटीतून मनुस्मृतीपासून बायबल-कुराणादी सर्व धर्मग्रंथांना कपाटात बंद करुन ठेवण्यास सांगणाऱ्या सावरकरांविषयी ‘सावरकरांचा बुद्धीवाद-एक चिकित्सक अभ्यास’ हा पाचशेच्यावर पृष्ठसंख्या असलेला ग्रंथ नांदेडच्या शेषराव मोरे यांनी लिहून नुकताच प्रसिद्ध केला आहे. . भूमिका . समाजसुधारकांविषयी लिहीताना बहुतेक विद्वान मंडळी म.फुले यांच्यापासून सुरुवात करुन कर्वे,आगरकर,म.गांधी असा प्रवास करीत डॉ.आंबेडकरांपर्यंत पोचतात. पुरोगामी, बुद्धीवादी विद्वानांच्या मालिकेविषयी साम्यवादी,समाजवादी आदी डाव्या विचारसरणीच्या गटांपासून सर्वजण आगरकर, आंबेडकर, मानवेंद्र रॉय, पं.नेहरु यांचीच नावे घेतात. पण या मालिकेत सर्वात महत्वाचे जे नाव यायला हवे त्या सावरकरांचे नाव मात्र नेमके वगळले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे सावरकरांच्या राजकीय विरोधकांना त्यांचा प्रखर हिंदुत्ववाद ‘सावरकर वादाचा ’ खरा अभ्यास करण्यापासून परावृत्त करतो. . ज्याप्रमाणे हे स्वयंघोषित ब...